Saturday, March 13, 2010

Lets take the Initiative....By Vishakha-Swati

Hello friends,

मला माहितीय ही community join केलेल्या प्रत्येकाला अगदी मनापासून आपलं सोलापूर सुधारावं, त्याचं भारताच्या नकाशात आधीसारखं मानाचं स्थान असावं, असं वाटतंय.
काही वर्षांपूर्वी मुंबई पुण्यानंतर सोलापुरच नाव घेतलं जायचं. बहुदा लोकाना पण अपेक्षा असतील नव्यानं उभारी घेणारा जिल्हा म्हणून..... पण आजकाल मोठ्या नाच गाण्याच्या स्पर्धा पण मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर इथेच घेतल्या जातात. आपलं सोलापूर का मागं पडतंय याचा विचार आपणच करायला हवा.
In fact, आतल्या आत खूप तगमग होते, पण हे सर्व तडीपार न्यायला हातात सत्ता असणे पण गरजेचे असते.
आपल्याला तेच करायचं आपले हे विचार, आपली तगमग सोलापूरच्या अशा लोकांपर्यंत पोचवायचीय जे खरोखर काही करू शकतील. कारण आपण ही community create करून त्यात आपले हे विचार मांडतोय हे त्या लोकांना माहित पण नसेल.
तर मग बोला, एक दिवस निश्चित करून सोलापूरला जाऊन या लोकांची भेट घ्यायला कोण कोण तयार आहे?
मला तुमची साथ हवीय....बाकीच्या गोष्टी आपसूक जुळून येतील मग.............
So please start responding POSITIVELY........... 


No comments:

Post a Comment