Wednesday, June 16, 2010

वृक्षारोपण (दिनांक ०५/०६/२०१०)

दिनांक ०५/०६/२०१० रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त "समर्थ भारत व्यासपीठ" आणि "आम्ही सोलापूरकर" यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण करण्यात आले.

पार्क चौकातील बेंगलोर अयंगार बेकरी पासून जम्बोकिंग वडापाव पर्यंत पंधरा झाडे लावण्यात आली. सदर झाडे " आम्ही सोलापूरकर " कडून दुकान दारांना "दत्तक" देण्यात आली आहेत. हि झाडे वाढवण्याची सर्व जबाबदारी येथील दुकानदार घेणार आहेत. ही जबाबदारी घेतल्याबद्दल "आम्ही सोलापूरकर" रेमंड, स्पेक्टो,बेंगलोर अयंगार बेकरी,महेंद्र इलेक्ट्रोनिक्स, जेन्ट्स , जे.दि. स्पोर्ट्स, मीरा साडी ,एच एंड ए, आणि जम्बोकिंग वडापाव यांचे आभारी आहोत...


:Niraj Godbole